scorecardresearch

पुणे : हिंदी मालिकांमध्ये काम देण्याच्या आमिषाने तरुणीची ७१ हजारांची फसवणूक

फिर्यादी तरुणीने फिर्यादी ही एका वसतिगृहात राहते. तिने फेसबुकवर हिंदी मालिका व चित्रपटात काम करण्यासंबंधीची जाहिरात पाहिली होती. मात्र, आरोपीने तिच्याकडून काम देत पैसे उकळल्याचे समोर आले आहे.

पुणे : हिंदी मालिकांमध्ये काम देण्याच्या आमिषाने तरुणीची ७१ हजारांची फसवणूक
प्रातिनिधिक छायाचित्र

हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम करण्याची; तसेच ऑडिशन देण्यासाठी विविध कारणे सांगून एका तरुणीला सायबर चोरट्यांनी सुमारे ७१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २० वर्षांच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तरुण चंद्रशेखर शर्मा (रा. चंदीगड), आशासिंग, क्रिशन चांद (रा. पंजाब) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- पिंपरीः भोसरीत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही एका वसतिगृहात राहते. तिने फेसबुकवर हिंदी मालिका व चित्रपटात काम करण्यासंबंधीची जाहिरात पाहिली. त्यावर ऑडिशनसाठी संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यानुसार तिने संपर्क साधला असता, तिला वेगवेगळी कारणे सांगून ७१ हजार ८४९ रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतरही कोणतीही ऑडिशन घेतली नाही. त्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा फसवणूक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 17:47 IST

संबंधित बातम्या