पिंपरी पालिकेच्या ७३ सफाई कर्मचाऱ्यांना सदनिका मिळणार

विशिष्ठ स्वरुपाचे काम तसेच त्यांचा सामाजिक, आर्थिक दर्जा विचारात घेऊन राज्यशासनाने त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सदिनका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

पिंपरी पालिकेच्या ७३ सफाई कर्मचाऱ्यांना सदनिका मिळणार
महापालिका मुख्यालयात याबाबतची सोडत काढण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात यातील लाभार्थ्यांना आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले

पिंपरी महापालिकेच्या वतीने २५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या ७३ सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सदनिका देण्यात येणार आहेत.

महापालिका मुख्यालयात याबाबतची सोडत काढण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात यातील लाभार्थ्यांना आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदी उपस्थित होते.
सफाई कर्मचारी स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवतात. त्यांचे विशिष्ठ स्वरुपाचे काम तसेच त्यांचा सामाजिक, आर्थिक दर्जा विचारात घेऊन राज्यशासनाने त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सदिनका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पिंपरी पालिकेतील ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे. असे कर्मचारी तसेच सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, मयत कर्मचारी अथवा त्यांचे पात्र वारसदार यांना २६९ चौरसफुट चटई क्षेत्राची मोफत सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नावावर कोणतीही मिळकत नाही. तसेच त्यांच्या पती किंवा पत्नी यांच्या नावावर मिळकत नाही. ज्यांनी सदनिका घेण्याकरीता महापालिकेकडून कोणताही लाभ घेतला नाही. अशा ७३ सफाई संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना दापोडीतील गणेश हाईटस्, सुखवानी वुडस आणि गणेश किनारा या इमारतीमधील सदनिका देण्याचे निश्चित केले आहे. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या सदनिका वितरणाची सोडत काढण्यात आली. सोमवारी आयुक्तांच्या हस्ते प्रातिनिधिक पत्र वाटप करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : यंदा राज्यातील आठशेहून अधिक तंत्रशिक्षण महाविद्यालयांकडून शुल्कवाढ नाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी