सशस्त्र टोळक्याने धुडगूस घातल्याने देहूरोड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथील रहिवाशी नेहमीच भीतीच्या वातावरणात असतात. असाच एक प्रकार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. देहुरोड परिसरामध्ये सशस्त्र अज्ञात टोळक्यांनी ९ ते १० वाहनांची तोडफोड केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार मध्यरात्री मुकाई चौक आणि किवळे परिसरात ८ ते १० जणांच्या सशस्त्र टोळक्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न करत ९  ते १० वाहनांची तोडफोड केली यात पाच कार, दोन टेम्पो, एक स्कूल बस, दोन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

hardik pandya marathi news, krunal pandya marathi news
पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

या घटनेत एका २१ वर्षीय तरूणाला टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. गंभीर जखमी झालेल्या नितीन गोसावी या तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रात्रभर चाललेल्या या टोळक्याच्या उच्छादाने देहुरोड पोलिसांची तारांबळ् उडाली. तोडफोड झालेल्या अनेक ठिकाणी पोहचून सुद्धा एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही, परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुंडावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या आधीही अशा घटना देहूरोड परिसरात घडल्या आहेत. मात्र पोलीस अधिकारी या घटना गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. सशस्त्र फिरणाऱ्या टोळक्यांच्या भितीने स्थानिक नागरिक धास्तावले आहेत. परिसरात गटातटांच्या भांडणामुळे गुंडाच्या टोळया निर्माण झाल्या आहेत. तोडफोड किंवा दहशत माजवण्याचे प्रकार याआधीही घडले आहेत.