धक्कादायक! पुण्यात ८ वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार | Loksatta

धक्कादायक! पुण्यात ८ वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार

ही मुले खेळण्याच्या बहाण्याने मुलीला गच्चीवर किंवा घरी घेऊन जात

धक्कादायक! पुण्यात ८ वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार

पुण्यातील कोंढवा परिसरात एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखत होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला. याबाबत अधिक चौकशी केली असता मुलीने सर्व प्रकार सांगितला. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. आरोपी असलेली पाच मुले खेळण्याच्या बहाण्याने मुलीला गच्चीवर किंवा घरी घेऊन जात असत. त्या ठिकाणी हे सर्वजण मिळून आपल्यावर अत्याचार करायचे, अशी माहिती मुलीने कबुली जबाबात दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींपैकी दोघेजण १० वर्षांचे असून एक मुलगा ६ तर एकजण ९ वर्षांचा तर एक जण १८ वर्षांचा आहे अशीही माहिती समोर आली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2017 at 10:19 IST
Next Story
पालिकेचे २८ कोटींचे १०० प्रस्ताव