पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांनी (६० वर्षांपुढील) लसीकरणात बाजी मारली आहे. शहरासह जिल्ह्य़ात आतापर्यंत ८८ टक्के  ज्येष्ठांनी पहिली, तर ६४ टक्के  ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. इतर वयोगटातील अपेक्षित लाभार्थ्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वाधिक झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात इतर विभागांतील आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली, तर १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचेही लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरणासाठी शहरासह जिल्ह्य़ात ८३ लाख ४२ हजार ७०० अपेक्षित लाभार्थी आहेत. त्यापैकी आरोग्य कर्मचारी एक लाख ६३ हजार ३१९, इतर विभागांतील आघाडीचे कर्मचारी दोन लाख ८४ हजार ३७७, ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) १३ लाख २७ हजार ५००, ४५ ते ५९ वयोगटातील १८ लाख ८० हजार ६००, तर १८ ते ४४ या वयोगटातील ४६ लाख ८६ हजार ९०४ नागरिकांचा समावेश आहे.

दरम्यान, ४५ ते ५९ या वयोगटातील १८ लाख ८८ हजार ५० जणांनी पहिली, तर दहा लाख ४२ हजार २३९ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. १८ ते ४४ या वयोगटातील ४७ लाख ४२ हजार ६२२ जणांनी पहिली, तर १६ लाख ९२ हजार ४३ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. या तुलनेत ११ लाख ६७ हजार ७७५ जणांनी पहिली, तर आठ लाख ५५ हजार ३२ ज्येष्ठ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. त्यामुळे १८ ते ४४ आणि ४५ ते ५९ या वयोगटांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण जास्त असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लसीकरणाचा आढावा

शहरासह जिल्ह्य़ात ‘मिशन कवच कु ंडल’ लसीकरण मोहिमेंतर्गत दोन लाखांहून अधिक नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली. या मोहिमेंतर्गत एकू ण पावणे चार लाख जणांना पहिली किं वा दुसरी मात्रा देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील एक लाख ६२ हजार ३८९ जणांनी पहिली, तर दोन लाख १२ हजार ७४९ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.