राज्याच्या लोकसंख्येत १८ ते १९ वर्षे वयोगटातील ३. ५ टक्के तरुण आहेत. मात्र त्यापैकी केवळ ०. ३४ टक्के तरुणांची मतदार यादीत नोंदणी आहे. २० ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या १८ टक्के असताना मतदार यादीत १२ टक्के तरुण मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९० टक्के, २० ते २९ वयोगटातील ३० ते ३५ टक्के मुले-मुली मतदार यादीत नाहीत, अशी माहिती देत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तरुणांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली.

हेही वाचा >>>पुणे : उरुळी देवाची, फुरसुंगीच्या विकासासाठी ५०० कोटींहून अधिक खर्च; मिळकत कर, बांधकाम शुल्कातून महापालिकेला २२५ कोटींचे उत्पन्न

supriya sule file nomination
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; अजित पवार, प्रतिभा पवारांनाही कर्जपुरवठा
यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट
Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली
Women MP in parliement
Loksabha Election : महिला उमेदवारांची संख्या वाढतेय; पण जिंकणाऱ्यांचं प्रमाण का घटतंय? १९५७ पासूनची आकडेवारी काय सांगते?

पुणे जिल्ह्यातील १५ शाळा व ४३ महाविद्यालयांत स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक साक्षरता मंडळांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या देशपांडे बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, एमआयटी संस्थेच्या कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा कराड, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय व्यवस्थापक डी. कार्तिकेयन आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी

देशपांडे म्हणाले, की लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शाळा, महाविद्यालयीन पातळीवर निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुण्यामध्ये हाती घेतला आहे. निवडणूक साक्षरता मंडळ प्रकल्प यशस्वी होण्यासाठी काही सवलती देण्याचे ठरवले आहे. त्यात विद्यार्थ्यांची महाविद्यालय सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाची नोंद मोबाइल ॲपच्या माध्यमातून होणार असून विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पुढील एकदोन वर्षात चांगले बदल घडवण्यासाठी सर्वांच्या योगदानातून हा राष्ट्रीय स्तरावरील एक पथदर्शी प्रकल्प ठरेल. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात १८ ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या २३ लाख असताना त्यापैकी केवळ ११ ते १२ लाख जणांनी मतदार नोंदणी केली आहे. ही बाब लक्षात घेऊन मतदार नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनाने महाविद्यालयांच्या सहकार्यातून ४४२ महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या विशेष शिबिरांतून ४३ हजार पेक्षा जास्त मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीयांनी नोंदणी केली आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या नोंदणीसाठीही प्रयत्न सुरू आहेत.