पुणे : जिल्ह्यात ९५ जणांना नव्याने करोना संसर्ग | 95 new corona infections in the district pune print news amy 95 | Loksatta

पुणे : जिल्ह्यात ९५ जणांना नव्याने करोना संसर्ग

मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील ९५ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली.

पुणे : जिल्ह्यात ९५ जणांना नव्याने करोना संसर्ग
संग्रहित छायाचित्र

मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील ९५ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणावर शस्त्राने वार

मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या ९५ नवीन रुग्णांपैकी ५९ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. २७ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर नऊ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंगळवारी आढळलेल्या ९५ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १५ लाख दोन हजार १९९ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७९६ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
निर्बंधमुक्त उत्सव असले, तरी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे ; चंद्रकांत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

संबंधित बातम्या

पुण्याच्या कात्रजमध्ये मोटारीला वाट न दिल्याने टेम्पोचालकास बेदम मारहाण; मोटारचालक अटकेत
पुणे:राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
खाऊखुशाल : कृपासिंधू
संजय पार्क परिसरातील अतिक्रमणे हटवली

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यात हत्तींचा उच्छाद कसा रोखणार?
मोठी बातमी! कुख्यात दहशतवादी, लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
VIDEO: “…म्हणून काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देणं सुरू केलं”, देवेंद्र फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
FIFA World Cup 2022: …म्हणून यावेळी लिओनेल मेस्सी विश्वचषक जिंकणार? अर्जेंटिनासाठी अजब योगायोग
Akshaya Hardeek Wedding Live : ‘आली लग्नघटिका समीप..” अक्षया देवधर-हार्दिक जोशी अडकणार विवाहबंधनात