पुणे : एका पंधरा वर्षांच्या मुलीला अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला दुर्मीळ विकाराचे निदान होण्यासोबतच हिमोग्लोबिनची पातळी मोठ्या प्रमाणात खाली आल्याचे समोर आले. त्याच वेळी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अशा गुंतागुंतीच्या स्थितीत डॉक्टरांनी अत्याधुनिक पद्धतीने उपचार करून या मुलीला जीवदान दिले.

या मुलीला गंभीर अवस्थेत आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला गुदद्वारातून रक्तस्रावाचा त्रास होत होता. ती रक्तस्रावामुळे आणि अत्यल्प रक्तदाबामुळे त्रस्त होती. तिची हिमोग्लोबिन पातळीही १२ वरून ५ वर आली होती. रक्त देऊनही तिचा रक्तस्राव थांबत नव्हता. त्या वेळी डॉक्टरांना अंतर्गत जखमेचा संशय आला. त्याच वेळी या मुलीला अतिदक्षता विभागातच हृदयविकाराचा तीव्र झटका दिला. डॉक्टरांच्या पथकाने तब्बल १५ मिनिटे सीपीआर देऊन तिचे हृदय पुन्हा कार्यरत केले.

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
14 year old girl living in slum raped by retired police sub inspector from Nagpur city police Force
निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा १४ वर्षीय मुलीवर बलात्कार
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…
19 year old youth hit three to four vehicles after drinking in pune
पुणे: १९ वर्षीय तरुणाने मद्यपान करून वाहनांना दिली धडक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा >>>लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण ताब्यात; मुंबई पोलिसांकडून कर्वेनगर भागात कारवाई

त्यानंतर या मुलीला तत्काळ शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांना मुलीला मीकल्स डिव्हर्टिक्युलम हा विकार असल्याचे निदर्शनास आले. यात आतड्याचा काही भाग फाटून तो रक्तस्रावाचे कारण बनला होता. डॉक्टरांनी आतड्याचा हा दोष यशस्वीपणे काढून टाकला आणि रक्तस्राव नियंत्रित केला. अतिशय गुंतागुतीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी अत्याधुनिक उपचारांद्वारे या मुलीवर उपचार केले.

हेही वाचा >>>मावळमध्ये महायुतीत फूट, भाजपच्या बाळा भेगडेंसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; अपक्ष बापू भेगडेंना पाठिंबा

या मुलीचा रक्तस्राव रोखून तिची प्रकृती पूर्वपदावर आणण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. त्या दृष्टीने शस्त्रक्रियेनंतरचे २४ तास महत्त्वाचे होते. या मुलीने शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्यावर व्यवस्थितपणे संवाद साधल्याने डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नंतर तिची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. काही दिवसांनंतर तिचा व्हेंटिलेटर हटविण्यात आला. अखेर १२ दिवसांनी ती बरी झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.

मुलीला आधीपासूनच असलेला दुर्मीळ विकार आणि त्यानंतर तिच्या प्रकृतीत झालेली गुंतागुंत यामुळे आमच्यासमोर आव्हान निर्माण झाले होते. या मुलीवर अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या साहाय्याने उपचार करून तिच्या प्रकृतीत निर्माण झालेली गुंतागुंत कमी करण्यात आली. तिनेही उपचारांना योग्य प्रतिसाद दिल्याने ती लवकर बरी झाली.- डॉ. अभिजित कराड, पोटविकारतज्ज्ञ, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल

Story img Loader