A boyfriend disturbance in front of his girlfriend house pune print news rbk 25 ssb 93 | Loksatta

पुणे : अबोला धरल्याने प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ, तरुणाला पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस

या प्रकरणी पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणावर कारवाई करून त्याला प्रतिबंधात्मक कारवाईचे नोटीस बजावून समज दिली आहे.

boyfriend disturbance girlfriend house pune
अबोला धरल्याने प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ (प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ घातल्याची घटना खडकी भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणावर कारवाई करून त्याला प्रतिबंधात्मक कारवाईचे नोटीस बजावून समज दिली आहे.

हेही वाचा – पुणे : पैसे मागितल्याने गुंडांचा पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला

हेही वाचा – पुणे : वडिलोपार्जित अडीच कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार, न्यायालयाच्या आदेशाने बहिणीसह मुलांवर गुन्हा

तरुणाचे दीड वर्षांपूर्वी खडकी भागातील एका तरुणीशी प्रेमसंबध होते. त्यांच्यात वाद झाल्याने तरुणीने प्रेमसंबंध तोडले. रविवारी रात्री तरुण तरुणी राहत असलेल्या सोसायटीत गेला. तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खाली बोलावले. तिने सोसायटीच्या आवारात येण्यास नकार दिल्याने तरुण चिडला. त्याने शिवीगाळ करून सोसायटीच्या आवारात गोंधळ घातला. या घटनेनंतर तिने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खडकी पोलिसांनी तरुणाला बोलावून घेतले. त्याला प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावून समज दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:42 IST
Next Story
पुणे : पैसे मागितल्याने गुंडांचा पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला