दुर्मीळ आजारामुळे ११ वर्षे त्रस्त असलेल्या आणि त्यामुळेच फुफ्फुस आणि हृदय निकामी झालेल्या एका महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ब्रेनडेड झालेल्या महिलेचे हृदय आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करुन ३७ वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले आहे. पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नुकतीच ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याच्या सिंहगड रोड येथील रहिवाशी व बँक कर्मचारी प्राजक्ता दुगम यांना गेल्या ११ वर्षांपासून फुफ्फुसाचा लिम्फॅन्गिओलि ओमायो मॅटोसिस (एलएएम) हा दुर्मीळ समजला जाणारा आजार होता. हा आजार तरुण महिलांना शक्यतो बाळंतपणाच्या काळात होतो. प्राजक्ता यांना आजारामुळे ऑक्सिजन सिलींडर पाठीवर बांधून कामावर जावे लागत होते. तरीही त्यांचे हृदय आणि फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. अशा परिस्थितीत अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता. एका २७ वर्षीय ब्रेन- डेड महिलेच्या नातेवाइकांनी मृत्युनंतर तिचे सर्व अवयव दान करण्यास संमती दिल्यामुळेच प्राजक्ता यांना हृदय आणि फुफ्फुस बसवण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्राजक्ता यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. 

हेही वाचा : पुणे : जिल्ह्यातील १०६१ ग्रामपंचायतींना आंतरमहाजाल सेवा

‘‘माझी अत्यंत अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या टीमने यशस्वी केली. शस्त्रक्रिया व त्यानंतर तितकीच योग्य रीतीने काळजी घेण्यात आली. मी आता बरी झाली असून अनुभवी डॉक्टर, सपोर्ट स्टाफ आणि हॉस्पिटलच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मला नवे जीवन मिळाले आहे. मी या सर्वांची आभारी आहे’’, अशी भावना प्राजक्ता दुगम यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा : पुणे : सत्ताबदलानंतर शिवभोजन केंद्रांना टाळे; शहरातील ३२, ग्रामीण भागातील ४३ केंद्रे बंद

डॉ. संदीप अट्टावार यांच्या नेतृत्वाखालील डॉ. अनुराग गर्ग, डॉ. आशिष डोळस, डॉ. रणजित पवार, डॉ. प्रभात दत्ता, डॉ. विपुल शर्मा, आणि डॉ. संदीप जुनघरे या टीमने सुमारे आठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही अवघड कामगिरी पार पाडली. या रुग्णालयात तसेच पुणे परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे.  

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A brain dead woman was given life support to woman suffering from a rare heart lung disease kjp
First published on: 28-09-2022 at 12:10 IST