A case against a doctor who molested a nurse in Pune pune print news rbk 25 ssb 93 | Loksatta

पुणे : परिचारिकेचा विनयभंग करणाऱ्या डाॅक्टरविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी डाॅ. प्रसाद जोगदंड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

doctor molested nurse Pune
परिचारिकेचा विनयभंग करणाऱ्या डाॅक्टरविरुद्ध गुन्हा (प्रातिनिधिक छायाचित्र)

परिचारिकेस अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डाॅक्टरविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी डाॅ. प्रसाद जोगदंड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका परिचारिकेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक: काँग्रेस ‘एकला चलो’वर ठाम; निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धूसर

हेही वाचा – पुणे : रस्ता चुकल्याने झालेल्या वादातून ट्रकचालकाचा सहकाऱ्याकडून खून

डाॅ. जोगदंड यांच्या रुग्णालयात तक्रारदार परिचारिका कामाला होती. परिचारिकेने डाॅ. जोगदंड यांच्या रुग्णालयातील नोकरी २०१६ मध्ये सोडली होती. त्यानंतर डाॅ. जोगदंड यांनी परिचारिकेला संदेश पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. तिला मोबाईलवर अश्लील संदेश पाठविले. डाॅ. जोगदंड याच्या त्रासामुळे महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भैरव शेळके तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 15:45 IST
Next Story
पुणे : रस्ता चुकल्याने झालेल्या वादातून ट्रकचालकाचा सहकाऱ्याकडून खून