scorecardresearch

पुणे: युवतीवर बलात्कार प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा; समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी

युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुणे: युवतीवर बलात्कार प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा; समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
( लोकसत्ता ग्राफिक टीम )

युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.संजय बाळू शितापे (वय २१, रा. माळीनगर, अकलूज, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय आणि युवतीची ओळख झाली होती.

हेही वाचा >>>पुण्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्याची मागणी

ओळखीतून त्याने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला. युवतीचे छायाचित्र काढले. त्यानंतर युवतीची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्या नात्यातील एकास छायाचित्रे पाठविली. युवतीची बदनामी तसेच बलात्कार केल्या प्रकरणी शितापेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 12:59 IST

संबंधित बातम्या