पुणे: मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना आई-वडिलांनी तिचा बळजबरीने विवाह लावून दिल्या प्रकरणी आई-वडिलांसह सासरकडील मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला

याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळींसह पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन होती. तिचे वय १७ वर्ष पाच महिने होते. मुलगी अल्पवयीन असताना तिचा विवाह एका २७ वर्षीय तरुणाशी करण्यात आला. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली. मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर डाॅक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सासरच्या मंडळींसह पीडितेचे आई-वडिल यांच्याविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पाेक्सो), तसेच बाल विवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा >>>विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेचे ध्वनीवर्धक वापरल्यास जप्त; ध्वनीवर्धक यंत्रणा पुरवठादार, ‘डीजें’ विरुद्ध कारवाईचा इशारा

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा

लोहगाव भागात एका सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका ५५ वर्षीय दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखळ करण्यात आला. याबाबत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुकानमालक नायडू (वय ५५) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. मुलगी सोसायटीच्या आवारात खेळत होती. त्यावेळी या परिसरातील अंशू जनरल स्टोअर्सचा मालक नायडूने मुलीकडे वाईट नजरेने पाहिले. तिच्याकडे पाहून इशारे केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करत आहेत.