अल्पवयीन शाळकरी मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वानवडी येथील एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुख्याध्यापक पीडित मुलाच्या पालकांच्या ओळखीचे आहेत. मुख्याध्यापक जेव्हा मुलाच्या घरी गेले होते तेव्हा त्यांनी पीडित मुलासोबत अश्लील कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हणले आहे.

हेही वाचा- राज्यातील पाऊस यंदा सरासरीपुढेच; कोकणात प्रमाण कमी; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक

अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या विरोधात कारवाई न केल्याप्रकरणी पुणे आणि मुंबईतील दोन धर्मगुरुंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर (वय ५२, रा. चिंचवड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी या प्रकाराची तक्रार केली होती. संबंधित मुख्याध्यापक मुलाच्या आई-वडिलांच्या ओळखीचे आहेत. मुख्याध्यापक मुलाच्या घरी गेले होते.

हेही वाचा- रिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू

त्यावेळी मुलाचे आई-वडील घरी होते. त्यांच्याशी गप्पा मारल्‍यानंतर मुख्याध्यापक मुलाच्या खोलीत गेले आणि अश्लीक कृत्य केले. मुलाने या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मुलाचे आई-वडील मुख्याध्यापकाकडे गेले होते. मी कोणाला घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापकाची पुणे आणि मुंबईतील धर्मगुरुंकडेव तक्रार करण्यात आली.मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. माजी मुख्याध्यापकावर यापूर्वी देखील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील ढमरे करीत आहेत.