लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी नागनाथ गुलाब शिंदे (वय ५४, रा. वानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने वानवडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे याचा विवाह झाला असून, त्याला दोन मुले आहेत. तक्रारदार महिलेशी शिंदेची ओळख झाली. त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो वानवडीतील महिलेच्या सदनिकेत राहू लागला. त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने महिलेशी आळंदी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
vasai police station
वसई: सावकारीचा गुन्हा दाखल होण्याची भीती, पती-पत्नीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
man in pune entered house of elderly woman and tried to kill her
पुणे : धक्कादायक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न, गजबलेल्या गणेश पेठेतील घटना; आरोपी अटकेत
Pune Police, Kalyani nagar accident, Juvenile Justice Board, Vishal Agarwal, prosecution, accident car, passport, court hearing, charge sheet, bail, judicial custody
कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी
pune woman suicide attempt front of police station
शिरुर पोलीस ठाण्यासमोर डिझेलओतून, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
woman attempted suicide, Shirur police station,
पुणे : शिरुर पोलीस ठाण्यासमोर डिझेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
Sindhudurg, Husband tried to kill himself,
सिंधुदुर्ग : पती पत्नी वादातून नवऱ्याने तीन मुलांसह स्वतःवर पेट्रोल ओतून ठार मरण्याचा केला प्रयत्न

विवाहानंतर सुरुवातीला शिंदे चांगला वागला. त्याने महिलेकडे पैशांची मागणी सुरू केली. महिलेने वाघोलीतील आईच्या नावावर असलेली जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केला. जमीन व्यवहारातील पहिला हप्त्यापोटी मिळालेले दीड लाख रुपये तिने शिंदेला दिले. त्यानंतर त्याने महिलेच्या नावावर असलेली सदनिका बळाकाविण्याचा प्रयत्न केला. सदनिकेची विक्री करून त्याने पैशांची मागणी केली. महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. त्याचा छळ असह्य झाल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत शिंदे विवाहित असताना त्याने ही बाब महिलेपासून लपविल्याचे उघड झाले. पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर तपास करत आहेत.