शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाच्या विरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भगवती प्रसाद शर्मा (वय ५५, रा. पार्कलेन सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेही वाचा- पुणे : येरवडा भागातील गुंड टोळीवर ‘मोक्का’ तक्रारदार मुलगी चंदननगर भागातील एका शाळेत आहे. आरोपी शर्मा कार्यानुभव विषयाचा शिक्षक आहे. सोळा वर्षीय मुलगी वर्गात एकटी होती. त्या वेळी शर्मा यांनी मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला. विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करत आहेत.