संक्रातीत पतंगबाजीसाठी बेकायदा नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या खडकी बाजारातील एका दुकानावर छापा टाकून पोलिसांनी नायलॅान मांजा जप्त केला. नायलाॅन मांजाची बेकायदा विक्री केल्या प्रकरणी पतंग विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- मकरसंक्रांतीला शनि-सूर्य युती झाल्याने ‘या’ राशींवर येणार मोठे संकट? पुढील ११ दिवस जरा जपूनच नाहीतर..

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

या प्रकरणी तांबाेळी जनरल स्टोअर्सचे मालक अदीप अब्दुल करीम तांबोळी (रा. जुना बाजार, खडकी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संक्रात आठवड्यावर येऊन ठेपली आहे. संक्रातीत पतंग उडविण्यासाठी नायलाॅन मांजाचा वापर करण्यात आल्याने पशू, पशी तसेच नागरिकांना मांजामुळे गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नायलाॅन मांज्याची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तांबोळी बेकायदा नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांबोळी याच्या दुकानावर छापा टाकून नायलाॅन मांजा जप्त केला.

हेही वाचा-“तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?”, राज ठाकरेंच्या उत्तराने पिकला हशा

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, सहायक फौजदार महेंद्र पवार, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे आदींनी ही कारवाई केली. तांबोळी याच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनिमय १९८६ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.