scorecardresearch

पुणे: श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shyam Manav
श्याम मानव ( लोकसत्ता संग्रहित छायाचित्र )

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम मानव यांना धमकी देणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याबाबत श्याम मानव यांचा मुलगा क्षितिज यामिनी शाम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> धीरेंद्र शास्त्री महाराजांचा ‘पठाण’ला होता विरोध; ‘बेशरम रंग’बाबतही केलेलं मोठं वक्तव्य, म्हणाले “हिरवा रंग…”

क्षितिज बावधन भागात राहायला आहेत. क्षितिज यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संदेश पाठविला. संदेशात शिवीगाळ करण्यात आली आहे. घरावर बाँब फेकून श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी संदेशात देण्यात आली आहे. श्याम मानव बावधन भागातील घरी होते. त्या वेळी अज्ञाताने क्षितिज यांना धमकी देणारे संदेश पाठविले आहेत. या प्रकरणाचा हिंजवडी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:43 IST