scorecardresearch

Premium

लोणावळ्यात हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; हैदराबादमधील तिघेजण ताब्यात

याप्रकरणी बालकृष्ण विरेशम मुन्था (वय २९), के. दिनेश के. आनंद (वय २९), तनिष तिलक तेजा श्रीनिवास राव (वय २५, तिघे रा. हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case registered three people filming drone cameras ​​Air Force Base Lonavala pune
लोणावळ्यात हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; हैदराबादमधील तिघेजण ताब्यात (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: लोणावळ्यातील हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांकडून ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेले तिघेजण मूळचे हैदराबादचे आहेत.

adv kh deshpande personality role model for youth says supreme court justice bhushan gavai
“ॲड. के.एच.देशपांडे यांचे व्यक्तीमत्व तरुणांसाठी आदर्श,” सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वक्तव्य
Vanchit Aghadi march sangli
सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा
Udhayanidhi Stalin
तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन यांच्याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
rajput
नागपूर: पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडून तपास काढला; लैंगिक अत्याचार, छळ प्रकरण

लोणावळ्यातील लायन्स पाॅईंट परिसरात हवाई दलाचा तळ आहे. लोणावळ्यात नौदलाची आयएनएस शिवाजी संस्था आहे. लोणावळ्यात महत्त्वाच्या लष्करी संस्था असल्याने या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत लायन्स पाॅईंट परिसरात हवाई दलाने फलक लावले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली असताना लायन्स पाॅईंट परिसरात चित्रीकरण करण्यात येत असल्याची माहिती हवाई दलातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोणावळा शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा… भोसरीतील वीज समस्या सुटणार, महावितरणने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

याप्रकरणी बालकृष्ण विरेशम मुन्था (वय २९), के. दिनेश के. आनंद (वय २९), तनिष तिलक तेजा श्रीनिवास राव (वय २५, तिघे रा. हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेशाचा भंग करणे, तसेच बेकायदा चित्रीकरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. तिघांकडून ड्रोन जप्त करण्यात आला असून, त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A case registered against three people for filming with drone cameras in the area of air force base in lonavala pune print news rbk 25 dvr

First published on: 26-09-2023 at 17:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×