भरधाव एसटी बसच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.संजय सुदाम साळवे (वय ४०, रा. रामटेकडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी एसटी बसचालक चाँद सुलतान नसरुद्दीन शेख (वय ३१, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>पुणे: पीएच.डी. संशोधन केंद्रांतील गैरप्रकारांना चाप?

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

याबाबत दुचाकीस्वार प्रकाश अशोक घुसर (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार घुसर आणि साळवे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर रस्त्याने निघाले होते. हडपसर भागातील रामटेकडी चौकात भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी साळवे गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार घुसर याला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या साळवे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.