महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार पेठेत घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. सुदर्शन मारुती झरे (वय १८, रा. शनिवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे : मावळातील नायगावात गोळीबार; वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, तिघे जखमी

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
college girl commit suicide over love affair
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

सुदर्शनचे आई-वडील नोकरी करतात. तो बारावीत आहे. सोमवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सातच्या सुमारास त्याचे आई-वडील कामावरुन परतले. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी त्याला हाक मारली. सुदर्शनने प्रतिसाद दिला नाही. दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. तेव्हा सुदर्शनने प्रसाधनगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुदर्शनच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही, असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.