A college youth was attacked by Koyta Gang in Appa Balwant Chowk in Pune pune print news rbk 25 ssb 93 | Loksatta

पुण्यात अप्पा बळवंत चौकामध्ये कोयता गँगकडून महाविद्यालयीन युवकावर वार, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून अल्पवयीन महाविद्यालयीन युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकात कोयते उगारल्याने परिसरात घबराट उडाली.

college youth was attacked pune
पुण्यात अप्पा बळवंत चौकामध्ये कोयता गँगकडून महाविद्यालयीन युवकावर वार (प्रातिनिधिक छायाचित्र)

बाजीराव रस्त्यावर महाविद्यालयीन युवकाच्या दोन गटात झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली. मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून अल्पवयीन महाविद्यालयीन युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकात कोयते उगारल्याने परिसरात घबराट उडाली.

हेही वाचा – पुणे : जेवायला न दिल्याने रिक्षाचालकाकडून पत्नीचा खून

हेही वाचा – कसब्यात आता भावनिक रंग

या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील नूमवि शाळेसमोर महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत दुपारी वाद झाला. त्यानंतर कोयते उगारून दहशत माजविण्यात आली. दोघांनी एका युवकावर कोयत्याने वार केला. कोयते उगारून अप्पा बळवंत चौकातून दोघे जण पळाले. ज्या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले त्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या अल्पवयीन युवकांचा पोलिसांकडून शाेध घेण्यात आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 15:42 IST
Next Story
कसब्यात आता भावनिक रंग