पुणे: इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट, दोन घरं जळून खाक

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातल्या कोंढवा भागातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन घरं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, कोंढवा येथील वेलकम हॉलजवळील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन घरं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले असून यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A cylinder explosion on the fifth floor of the building at pune in this incident two houses burnt down aau

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या