पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर तोतया पोलिसाला पकडण्यात आले. पोलीस दलातील बदलीसाठी तोतयाने वरिष्ठ अधिकारी असल्याच्या बतावणीने एका पोलीस कर्मचाऱ्याकडे पैसे मागितले होते.

अमित जगन्नाथ कांबळे (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी रुस्तुम मुजावर (वय ४७) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुजावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत नियुक्तीस आहेत. शनिवारी सायंकाळी मुजावर यांच्या मोबाइल क्रमांकावर कांबळेने संपर्क साधला. पोलीस निरीक्षक पाटील बोलतोय, अशी बतावणी केली. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची बदली करायची असेल तर सांगा, असे कांबळेने त्यांना सांगितले. कांबळेने बदली करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी केली.

Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

हेही वाचा – पुणे : कोथरूडमध्ये हप्ता न दिल्याने दुकानदारावर चाकूने हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास कांबळेने पुन्हा मुजावर यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मी किती वेळ वाट पाहू. पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबल्याचे कांबळे याने सांगितले. त्यानंतर मुजावर यांनी त्वरित या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना दिली. त्यानंतर मुजावर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. कांबळे तेथे आला. मुजावर यांना संशय आला. त्यांनी कांबळेची चौकशी केली. तेव्हा तो तोतया असल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा – शिवसेनेचे माजी बंडखोर नेते राहुल कलाटे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार? चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक

कांबळेवर राज्यभरात २५ गुन्हे

अमित कांबळे याच्या विरोधात पुणे, नगर, रत्नागिरी जिल्ह्यात फसवणुकीचे २५ गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने येरवडा कारागृहातील महिला रक्षकाची फसवणूक केली होती. लोकप्रतिनिधींचे हुबेहुब आवाज काढून फसवणूक करण्याचे गुन्हे त्याने केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करणे; तसेच अंतर्गत चौकशीत मदत करण्याच्या बतावणीने कांबळेने पोलिसांकडे पैशांची मागणी केली आहे. तो ऑनलाइन पद्धतीने पैसे घेत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून कांबळे पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती आणि मोबाइल क्रमांक मिळवत असल्याचे उघडकीस आले आहे.