scorecardresearch

पुणे शहरासह जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी अन्नधान्याचा संच

राज्य सरकारकडून निविदा काढण्यात येणार असून त्यांच्याकडूनच या चारही वस्तूंचे स्वतंत्र संच तयार करून घेतले जाणार आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी अन्नधान्याचा संच

पुणे : गरजू कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी २७० रुपये किमतीच्या वस्तू केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील नऊ लाख १६ हजार ३७१ कुटुंबांना लाभ होणार आहे. हे किट बुधवारी प्रशासनाला प्राप्त होणार आहे.राज्य सरकारकडून निविदा काढण्यात येणार असून त्यांच्याकडूनच या चारही वस्तूंचे स्वतंत्र संच तयार करून घेतले जाणार आहेत.

त्यानंतर हा एकत्रित माल जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण विभागाच्या गोदामांमध्ये आणण्यात येणार आहे. हा संच स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेवर एक संच याप्रमाणे त्याचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या