शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरुन टीका करत कुचित यांना जामीन देण्यात आल्याने संताप व्यक्त केला होता. या तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं चित्रा वाघ म्हटलं होतं. तरुणीने फेसबुकवर आपण स्वत:ला संपवत असल्याची पोस्ट केली असून ती मुलगी बेपत्ता आहे असा दावाही चित्रा वाघ यांनी केला होता. दरम्यान ही तरुणी अखेर समोर आली असून तिने एबीपी माझाशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत.

आपण संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली होती, पण कोणीही मदत केली नाही असा आरोप तरुणीने केला आहे. तसंच महिला आयोग आणि पोलिसांनी मदत न केल्यामुळेच आपण चित्रा वाघ यांच्याकडे गेलो असंही तिने सांगितलं आहे.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

“मुख्यमंत्री, या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका”; शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप करत चित्रा वाघ यांची मागणी

“सर्वात प्रथम मी निलम गोऱ्हे यांना फोन केला होता. गुन्हा दाखल करण्याआधी मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मी त्यांना खूप फोन केले, पण त्यांनी उचलले नाही. मग नंतर मी संजय राऊतांना फोन केला होता,” अशी माहिती तरुणीने दिली आहे.

पुढे बोलताना तिने सांगितलं की, “संजय राऊतांनी पहिल्या वेळी फोन उचचला नाही, पण दुसऱ्या वेळी उचलला. यावेळी त्यांना मी तुमच्या पक्षातील या व्यक्तीने मला फसवलं असून लैंगिक अत्याचार करत गर्भपात करायला लावल्याचं सांगितलं. त्यांनी मला निलम गोऱ्हेंशी संपर्क करण्यास सांगितलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, त्यांना अनेकदा फोन केले पण उचलत नाही आहेत. मग त्यांनी मी त्यांना फोन करतो आणि तुमचा नंबर देत संपर्क करायला लावतो असं सांगितलं. त्यानंतर १०-१५ मिनिटात निलम गोऱ्हेंच्या पीएचा फोन आला आणि बंगल्यावर बोलावून घेतलं”.

“निलम गोऱ्हेंनी माझ्याशी संवाद काय झालं याबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांनी स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधी मला फोनही केला नाही आणि विचारणाही केली नाही. संजय राऊतांनीही परत फोन केला नाही,” असा दावा तरुणीने केला आहे.