पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी-२० परिषदेच्या बंदोबस्तासह देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बाॅम्बशोधक-नाशक पथकातील श्वान ‘तेजा’ निवृत्त झाला. दहा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या तेजाला भावपूर्ण वातावरणात नुकताच निरोप देण्यात आला. तेजाच्या निवृत्तीनिमित्त शिवाजीनगर येथील बाॅम्बशोधक-नाशक पथकाच्या कार्यालयात नुकताच विशेष समारंभ आयोजित करण्यात आला.

पोलीस दलात बाॅम्ब शोधक-नाशक पथकातील श्वान महत्त्वाची भूमिका बजावतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, संशयित वस्तू, स्फाेटकांची तपासणी, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची नियमित तपासणी, तसेच गंभीर गु्न्ह्यांच्या तपासात श्वान सहभागी होतात. दि. ११ जानेवारी २०१५ रोजी तेजाचा जन्म झाला. त्यानंतर महिनाभरात त्याचा पुणे पोलिसांच्या बाॅम्बशोधक-नाशक पथकात समावेश करण्यात आला. शिवाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) श्वान प्रशिक्षण केंद्रात तेजाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लॅब्रोडोर जातीचा तेजा बाॅम्बशोधक-नाशक पथकाच्या सेवेत रुजू झाला, अशी माहिती बाॅम्बशोधक-नाशक पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. जी. येळे यांनी दिली.

BMC Budget 2025 Latest Updates in Marathi
अग्रलेख : किती काळ…?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :ही तर भारतासाठी नामुष्कीच!
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Sunita Sawant SP Of Goa
Goa Police : दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांना एका रात्रीत हटवलं, दोन दिवसांपूर्वी झाला होता राज्यपालांकडून गौरव
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Mamata Banarjee
Kolkata Police Band : कोलकाता पोलीस बँडला राजभवनात प्रवेश नाकारला; प्रजासत्ताक दिनीच मुख्यमंत्र्यांची राज्यपालांसोबत खडाजंगी!

हेही वाचा – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

प्रशिक्षण कालावधीपासून पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, हॅण्डलर सहायक फौजदार अविनाश श्रीमंत, हवालदार किसन ढेंगळे यांनी तेजाचा सांभाळ केला. राष्ट्रपती, पंतप्रधानांंसह अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांचा बंदोबस्त, पालखी, गणेशोत्सव बंदोबस्तात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. जी-२० परिषद आणि शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात त्याने योगदान दिले.

दोन नवीन श्वान दाखल

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बाॅम्बशोधक-नाशक पथकाचे कामकाज चालते. तेजाच्या निवृत्तीनंतर पथकाची धुरा विराट, राणा, ध्रुवा, राॅकी, आझाद, वीर, शौर्य या श्वानांवर आहे. वीर आणि शौर्य यांचा पथकात नव्याने समावेश करण्यात आला असून, त्यांना श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा – उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय

श्वानाचा मायेने सांभाळ

बाॅम्बशोधक-नाशक पथकातील श्वानांचा मायेने सांभाळ करण्यात येतो. श्वान आजारी पडले, तर त्यांचा सांभाळ करणाऱ्या हस्तकांना झोप येत नाही. पोटच्या मुलाप्रमाणे श्वानांची काळजी घेतली जाते. साधारणपणे दहा वर्षांच्या सेवेनंतर श्वान निवृत्त होते. निवृत्तीनंतर त्याला श्वानप्रेमी किंवा संस्थेकडे सोपविले जाते. तत्पूर्वी त्यांच्या पात्रतेचे निकष पूर्ण केले जातात.

गावठी बॉम्ब शोधले

काही वर्षांपूर्वी भोसरीतील दिघी रस्त्यावर एका घरासमोर रानडुकराच्या शिकारीसाठी वापरले जाणारे गावठी बाॅम्ब फेकून देण्यात आले होते. एका बालिकेने खेळता-खेळता चेंडू समजून एक हातबाॅम्ब हातात घेतला आणि स्फोटात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बीडीडीएसचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्या वेळी झुडपांत टाकून दिलेले गावठी बाॅम्ब तेजाने एकट्याने शोधून काढले होते, अशी आठवण बाॅम्बशोधक-नाशक पथकातील हॅण्डलर अविनाश श्रीमंत यांनी सांगितली.

Story img Loader