पुणे : मोटारींना आपल्या आवडीचा क्रमांक मिळण्यासाठी अनेकजण लाखो रुपयांचा खर्च करत आहेत. दुचाकीसाठी असलेल्या नवीन क्रमांकाच्या मालिकेत मोटारींसाठी तिप्पट शुल्क भरून आणि लिलावात बोली लावून आकर्षक क्रमांकाची वाहनचालकांनी खरेदी केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) झालेल्या लिलावात १२१२ क्रमांकाला सर्वाधिक बोली लावण्यात आली.

आरटीओकडून दुचाकी अथवा मोटारींसाठी नवीन क्रमांकांची मालिका सुरू करण्याआधी त्यातील आकर्षक क्रमांकाचा लिलाव केला जातो. मोटारींसाठीच्या नवीन क्रमांकाची मालिका असल्यास क्रमांकानुसार १५ हजार रुपये ते ४ लाख रुपये शुल्क असते. हे शुल्क भरल्यानंतर लिलाव होतो आणि त्यात जास्त बोली लावणाऱ्यास तो क्रमांक दिला जातो. दुचाकीसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरू होत असल्यास मोटारींसाठी त्यातील आकर्षक क्रमांकाचा तिप्पट शुल्क आकारून लिलाव केला जातो. आकर्षक क्रमांकासाठी तिप्पट शुल्क आणि लिलावातील बोली अशी एकूण रक्कम द्यावी लागते.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’

हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी वाहतूक राहणार बंद

आरटीओमध्ये दुचाकी क्रमांकाच्या नवीन मालिकेतील पसंती क्रमांकाचे तिप्पट शुल्क आकारून मोटारींसाठी लिलाव झाले. त्यात १२१२ क्रमांकाला सर्वाधिक १ लाख ८० हजार १२ रुपयांची बोली लावण्यात आली. वाहन मालकाला त्यासाठी आधी तिप्पट म्हणजेच ४५ हजार शुल्क भरावे लागले होते. म्हणजेच त्याला हा क्रमांक एकूण २ लाख २५ हजार १२ रुपयांना पडला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

हेही वाचा – पुणे: शाळेतील प्रवेशावरून दाम्पत्यात वाद; महिलेने पतीला पेटवून दिले

सर्वाधिक बोली (आकडे रुपयांमध्ये)

क्रमांक – बोली – शुल्क
१२१२ – १,८०,०१२ – ४५,०००

७००० – १,०१,००० – ४५,०००
००११ – ८१,७८६ – १,५०,०००

०००५ – ७६,१०१ – १,५०,०००
०००७ – ७५,००० – १,५०,०००