scorecardresearch

पुण्यात कोंढवा बुद्रुक परिसरातील फर्निचर गोदामाला भीषण आग

अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी

पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील पारगेनगर येथील फर्निचरच्या गोदामाला आज(मंगळवार) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक परिसरातील पारगेनगर येथील एका फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याची माहिती दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिळाली. फर्निचर आणि अन्य साहित्य देखील गोदामात असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती.

घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशामक विभागाच्या दहा गाड्याच्या मदतीने काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यात गोदामधील सर्व साहित्य जळून खाक झाले, असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A huge fire broke out at a furniture warehouse in kondhwa budruk area in pune msr 87 svk

ताज्या बातम्या