पुणे : मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पालेभाज्या स्वस्त झाल्याने चांगली मागणी आहे. मेेथी, कोथिंबिरीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबिरीच्या सव्वा लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे- कोथिंबीर- ४०० ते ७०० रुपये, मेथी- ८०० ते १५०० रुपये, शेपू- ४०० ते ६०० रुपये, कांदापात- ६०० ते १००० रुपये, चाकवत- ४०० ते ७०० रुपये, करडई- ३०० ते ६०० रुपये, पुदिना- २०० ते ५०० रुपये, अंबाडी- ३०० ते ७०० रुपये, मुळा- ४०० ते ८०० रुपये, राजगिरा- ३०० ते ७०० रुपये, चुका-४०० ते ८०० रुपये, चवळई- ३०० ते ७०० रुपये, पालक- ८०० ते १२०० रुपये.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A huge influx of leafy vegetables in the vegetable section of the market yard pune print news rbk 25 amy