scorecardresearch

Premium

कंत्राटी पद्धतीने भरतीच्या विरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण

सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

rohit pawar
आमदार रोहित पवार (संग्रहित छायाचित्र)

पुणे : सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरकारी भरतीमध्ये गैरप्रकार होत आहेत. परीक्षा शुल्कच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडत आहे. शिक्षणाचे खासगीकरण, स्पर्धा परीक्षा, नोकर भरती, पेपर फुटी अशा घोटाळ्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी केला.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले वाडा येथे बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणाला काँग्रेस, विद्यार्थी अभ्यासिका समिती आणि कष्टकरी युवक संघटनेने पाठिंबा दर्शविला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, दीपक कामठे, यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde
राज्य सरकारचा मोठा निर्णय, मालकीच्या इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध करणारे रहिवासी निष्कासित होणार?
Kalyan Dombivli Municipality retain employees job fake caste certificate
कल्याण: बनावट जात दाखल्यांद्वारे कंत्राटी कामगार पालिका सेवेत कायम; राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार
Raiuka's agitation in Dhule
शासकीय सेवेत कंत्राटी भरतीविरोधात धुळ्यात रायुकाँचे आंदोलन
Uddhav Thackeray Udhayanidhi Stalin
“डेंग्यूसारखाच सनातन धर्मही….”, उदयनिधींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच भाष्य

हेही वाचा >>> काम करण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची टाळाटाळ… ‘हे’ आहे कारण

कंत्राटी भरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यात येत आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात आले. मात्र पेपर फोडण्यात आले. त्यामुळे तलाठी भरतीचे शुल्क परत मिळाले पाहिजे. राजस्थान सरकारसारखा कायदा राज्य सरकारने केला पाहिजे आणि परीक्षा घोटाळ्यासंदर्भात समितीकडून चौकशी झाली पाहिजे, अशा मागण्यात रोहित पवार यांनी केल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A hunger strike led by mla rohit pawar against contractual recruitment pune print news apk 13 ysh

First published on: 20-09-2023 at 18:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×