scorecardresearch

पिंपरी-चिंचवड : टायर्सच्या गोडाऊनला भीषण आग; शेजारील रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलवले

जुने टायर्स आणि भंगाराचे साहित्य असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. सुदैवाने यात जीविहितहानी झालेली नाही.

fire tire godown Kasarwadi
टायर्सच्या गोडाऊनला भीषण आग (image – loksatta team)

पिंपरी – चिंचवडच्या कासारवाडी परिसरात जुने टायर्स आणि भंगाराचे साहित्य असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. सुदैवाने यात जीविहितहानी झालेली नाही. परंतु, शेजारीच रुग्णालय असल्याने तेथील १९ रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयात हलवण्यात आले. पैकी, १२ जणांना महानगर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. 

ही घटना रात्री दोन वाजता घडली असून पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. एकूण १४ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले होते. पुणे- मुंबई जुन्या मार्गावर कासारवाडी येथे जुने टायर्स आणि भंगार असलेल्या गोडाऊला भीषण आग लागली. आग अत्यंत भीषण होती. घटनास्थळाच्या बाजूलाच मॅक्स निरो हॉस्पिटल असून, आगीच्या झळा बसण्याची शक्यता होती. त्यामुळे, रुग्णालयातील १९ रुग्णांना वेळीच इतर ठिकाणी हलवण्यात आले.

हेही वाचा – पुण्यातील कार्यालयाची जागा अ‍ॅमेझॉनकडून भाड्याने, आर्थिक मंदीचा फटका

हेही वाचा – पुरंदर विमानतळग्रस्तांना रोजगाराची संधी, खास संकेतस्थळाची निर्मिती

आगवीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी- ४, राहटणी- १, थेरगाव- १, प्राधिकरण-१, तळवडे-१, चिखली-१, भोसरी-१, खडकी कॉटेन्मेंट-१, टाटा मोटर्स-१, पीएमआरडीए मारुंजी-१, अशा एकूण १४ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:16 IST
ताज्या बातम्या