scorecardresearch

Premium

पुणे : साने गुरूजी मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला किरकोळ आग; भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्या हस्ते आरती सुरू असतानाच दुर्घटना

आंबिल ओढा वसाहत परिसरातील साने गुरूजी मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला मंगळवारी किरकोळ आग लागली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली.

fire at Sane Guruji Mandal decoration
पुणे : साने गुरूजी मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला किरकोळ आग; भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्या हस्ते आरती सुरू असतानाच दुर्घटना (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : आंबिल ओढा वसाहत परिसरातील साने गुरूजी मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला मंगळवारी किरकोळ आग लागली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. दरम्यान, आगीच्या घटनेनंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने आगीचा उद्रेक वाढला नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा – जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’

Mahatma Gandhi memorial Pimpri Chinchwad
पिंपरी : चार वर्षांपासून महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच
sanjay raut on rahul narvekar
“घानाच्या शिष्टमंडळात राहुल नार्वेकरांचं नाव नव्हतं, मात्र…”; आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊतांचा गंभीर आरोप
ganpati mandal catches fire
पुण्यात गणपती मंडळाच्या सजावटीला आग, भाजपा अध्यक्ष नड्डांच्या हस्ते आरती सुरू असताना घडला प्रकार, पाहा VIDEO
amit shah eknath shinde varsha home pray ganpati
गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब ‘वर्षा’ निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन

हेही वाचा – धक्कादायक! खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर कडेपठारच्या डोंगरावर अत्याचाराचा प्रयत्न

भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे हे गणेश मंडळ आहे. या मंडळाने यंदा उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी गणपतीच्या आरतीसासाठी आले असताना देखाव्याच्या कळसाला किरकोळ आग लागली. आग लागल्याचा प्रकार लक्षात येताच कार्यकर्त्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नड्डा यांना आरती सोडून जावे लागले. दरम्यान, जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने आग संपुष्टात आली. दरम्यान, या मंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A minor fire at sane guruji mandal decoration incident occurred while the aarti was being conducted by bjp president nadda pune print news apk 13 ssb

First published on: 26-09-2023 at 21:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×