पुणे : तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच हिसकावला

पादचारी तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली.

पुणे : तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच हिसकावला
( संग्रहित छायचित्र )

पादचारी तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर भागात राहायला आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वृंदावननगर परिसरातून ती जात होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्याने तिच्या हातातील ४० हजारांचा मोबाइल संच हिसकावून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक वेगरे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A mobile set worth 40000 was seized from the girl pune print news amy

Next Story
पिंपरी पालिकेच्या सर्व कार्यालयांत गुरुवारपासून दररोज सकाळी राष्ट्रगीत
फोटो गॅलरी