झोपण्याच्या जागेवरून झाला वाद, डोक्यात दगड घालून केला खून

आरोपी ताब्यात, पोलिसांकडे दिली गुन्ह्याची कबुली

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील हडपसर येथे अगदी शुल्लक कारणावरून एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून एक व्यक्तीचा खून करण्यात अल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामदास वाघमारे (वय 45 रा. वैदूवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर, अशोक देवडे (वय 76) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

या घटनेबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील वैदूवाडी येथील म्हाडा कॉलनी शेजारील मोकळ्या जागेत रामदास वाघमारे यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती बुधवारी रात्री उशीरा आम्हाला मिळाली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. रामदास वाघमारे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले, त्यांच्या मृतदेहाशेजारीच दगड देखील होता.

या घटनेबाबत परिसरात तपास व अधिक चौकशी केली असता, रामदास वाघमारेचा खून आपणच केल्याची कबुली अशोक देवडे याने स्वतः दिली. आमच्यामध्ये झोपण्याच्या जागेवरून वाद झाला होता, त्या रागातूनच आपण रामदास वाघमारेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे अशोक देवडेने सांगितले. या खून प्रकरणी आरोपी अशोक देवडे यास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A murder committed with stones in the head msr 87 svk

ताज्या बातम्या