scorecardresearch

खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेस्टाईल भर चौकात एकाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या विशाल चा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. दादा कांबळे याची ह्या व्यवसायात भागीदारी होती.

a person was killed in k by shooting bullets from a pistol in pimpri chinchwad crime police
खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेमास्टाईल भर चौकात एकाचा खून

पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवडमध्ये भर चौकात सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. १३ जणांच्या टोळक्याने अचानक येऊन गोळ्या झाडून विशाल गायकवाड या गुन्हेगारावर कोयत्याने सपासप वार केले. यात त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. विशालवर खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल होते. वॉशिंग सेंटरच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळावरून पिस्तूलातून झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या तीन पुंगळ्या मिळाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या विशाल चा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. दादा कांबळे याची ह्या व्यवसायात भागीदारी होती. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा खटके देखील उडालेले आहेत. तर, दादा कांबळे हा विशाल लष्करे सोबत असायचा. दोघे ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यातूनच त्यांनी विशाल गायकवाडची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झालेला विशाल गायकवाड हा परशुराम चौकात खुर्चीवर निवांत बसला होता. तेव्हा, १३ जणांच्या टोळक्याने येऊन पिस्तूलातून तीन गोळ्या झाडल्या, मग कोयत्याने सपासप वार करून विशाल ची निर्घृण हत्या करण्यात आली.

हेही वाचा: गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करा; पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन

या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे, पैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या झालेला विशाल गायकवाड, दादा कांबळे आणि विशाल लष्करे हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत. विशाल लष्करे ची स्वतंत्र टोळी आहे. त्याचा भाऊ पवन लष्करे ची काही दिवसांपूर्वी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा आणि विशाल गायकवाड च्या हत्येचा परस्पर काही संबंध आहे का? याचा देखील शोध पोलिस घेत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:08 IST
ताज्या बातम्या