scorecardresearch

पुण्यातील भवानी पेठेत पोलिसांनी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले

आरोपीकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली.

पुण्यातील भवानी पेठेत पोलिसांनी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : भवानी पेठेतील कासेवाडी भागात पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ऋषीकेश उर्फ सोन्या संदीप मंडलिक (वय २६, मूळ रा. लोहियानगर, सध्या रा. निंबाळकर वस्ती, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मंडलिक सराईत गुन्हेगार असून त्याने दहशत माजविण्यासाठी पिस्तुल बाळगल्याची माहिती खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संदीप तळेकर, विशाल जाधव यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, राकेश जाधव, तेजस पांडे, संदीप तळेकर, विशाल जाधव यांनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या