पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी मार्केट यार्ड भागात अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतूस जप्त करण्यात आले.आतिश बाळकृष्ण खंडागळे (वय २५, रा. आनंदनगर, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा- पुणे: खासगी बसच्या धडकेत मृत्यू; कुटुंबीयांना एक कोटी नऊ लाखांची नुकसान भरपाई

iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
mumbai petrol pump crime marathi news, petrol pump employee dragged by car marathi news
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मोटरीसोबत फरफटत नेले

खंडागळे याच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. तो मार्केट यार्ड परिसरात थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे, गायकवाड, धेंडे, यादव, सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.