scorecardresearch

पुणे: रात्रपाळीत पोलीस शिपायाचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; अलंकार पोलीस चौकीतील घटना

पोलीस शिपायाला पहाटे चारच्या सुमारास अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर ते झोपले. मात्र, सकाळी ते उठलेच नाही.

पुणे: रात्रपाळीत पोलीस शिपायाचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; अलंकार पोलीस चौकीतील घटना
प्रातिनिधिक छायाचित्र

एरंडवणे भागातील अलंकार पोलीस चौकीत रात्रपाळीत नियुक्तीस असलेल्या पोलीस शिपायाचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. योगेश लक्ष्मण आढारी (वय ४२) असे मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

हेही वाचा- पुण्यात बालिकेवरील अत्याचाराचा प्रकार नऊ वर्षांनंतर झाला उघड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

आढारी अलंकार पोलीस चौकीत शुक्रवारी रात्री नियुक्तीस होते. पहाटे चारच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ते झोपले. सकाळी सहकाऱ्यांनी त्यांना हाक मारली. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सकाळी साडेनऊच्या सुमारास चौकीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी आढारी यांची अलंकार पोलीस ठाण्यात बदली झाली होती. आढारी यांच्या अकस्मात मृत्युमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 15:48 IST

संबंधित बातम्या