scorecardresearch

Premium

पुणे : येरवडा कारागृहात गुंडाकडून पोलीस शिपायावर हल्ला

मोक्का कारवाई केलेल्या गुंडाने येरवडा कारागृहात पोलीस शिपायावर हल्ला केला. पोलीस शिपायावर पत्र्याच्या तुकड्याने वार केल्याची घटना घडली.

police constable attacked by goons
पुणे : येरवडा कारागृहात गुंडाकडून पोलीस शिपायावर हल्ला (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे: मोक्का कारवाई केलेल्या गुंडाने येरवडा कारागृहात पोलीस शिपायावर हल्ला केला. पोलीस शिपायावर पत्र्याच्या तुकड्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ऋषभ उर्फ सनी शेवाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे: ऑनलाइन ॲपवर झालेली ओळख महागात; महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

arrest Delhi Police arrested three people
कुख्यात दहशतवाद्यासह तिघांना दिल्ली पोलिसांकडून अटक; ‘एनआयए’ला हवा असलेला शाहनवाझ जाळ्यात 
prabhadevi naka mumbai, mumbai police, ganesh visarjan 2023, prabhadevi naka ganesh mandap, permission for mandap at prabhadevi naka
प्रभादेवी नाक्यावर स्वागत मंडपांना पोलिसांनी परवानगी नाकारली; गेल्यावर्षी ठाकरे आणि शिंदे गटांतील वादानंतर झाला होता गोळीबार
kalyan irani residential area, attacks on police, more than 30 cases registered on the accused
कल्याण जवळील इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ले करणारा अटकेत, ३० हून अधिक गुन्हे दाखल
mumbai dog dies after eating rat poison
उंदीर मारण्यासाठी ठेवलेला विषारी पदार्थ खाऊन कुत्र्याचा मृत्यू; पेस्ट कंट्रोलचे काम करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा – ‘सिटी टास्क फोर्स’ कागदावरच, राज्य शासनाकडून महापालिकेला स्मरणपत्र

याबाबत पोलीस शिपाई संतोष जगताप यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषभ शेवाळे आणि साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे. शे‌वाळे आणि साथीदारांना येरवडा कारागृहात आणण्यात आले. कारागृहातील सर्कल क्रमांक एकच्या परिसरात शेवाळेने त्याच्याकडील पत्र्याच्या तुकड्याने जगताप यांच्यावर हल्ला केला. कारागृह रक्षकांनी त्याला पकडले. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A police constable was attacked by goons in yerawada jail pune print news rbk 25 ssb

First published on: 03-10-2023 at 15:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×