लोणावळा : लोणावळ्यातील तुंगार्ली भागात एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई विकास कदम यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्वजण मुंबईतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: राजकीय मैदानावर पार्थ पवारांची बॅटिंग आणि बॉलिंग!
हेही वाचा – सुप्रिया सुळे यांचा फोन, व्हॉट्सअॅप हॅक; स्वतःच दिली माहिती
तुंगार्ली भागात एका बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दर्शनी मूल्य असलेल्या प्लास्टिक नाण्यांचा वापर करून पत्त्यांवर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंगल्यात छापा टाकला. पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य, पत्ते, रोकड असा दोन लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शिंदे तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd