scorecardresearch

पुणे: वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; येरवडा भागातील घटना

भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागात घडली.

पुणे: वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; येरवडा भागातील घटना
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश मेरसिंग राठोड (वय ६५, सध्या रा. अशोकनगर, येरवडा मूळ रा. बिटाळा, जि. यवतमाळ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. राठोड यांचे जावई देवराव पवार (वय ३८, रा. येरवडा) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड येरवडा भागातील शास्त्रीनगर भागातून निघाले होते. त्या वेळी हर्म्स सोसायटीजवळ भरधाव वाहनाने राठोड यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बी. एम. गुरव तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:13 IST

संबंधित बातम्या