Premium

पुणे : ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षाची आता होणार अचानक तपासणी; पोलीस आयुक्तांचे आदेश

ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या उपचार कक्षातून (वाॅर्ड क्रमांक १६) अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पसार झाल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची दररोज तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

surprise inspection
पुणे : ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षाची आता होणार अचानक तपासणी; पोलीस आयुक्तांचे आदेश (संग्रहित छायाचित्र)

पुणे : ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या उपचार कक्षातून (वाॅर्ड क्रमांक १६) अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पसार झाल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची दररोज तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. रात्रपाळीत गस्तीवर असलेले पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्तांनी ससूनमधील उपचार कक्षाची अचानक तपासणी करावी, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत असलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्याकडे अमली पदार्थ देण्यात येणार होते. गुन्हे शाखेच्या पथकाने पाटील याचा साथीदार सुभाष मंडल आणि ससूनच्या उपाहारगृहातील कामगार रौफ शेख यांना अटक केली होती. त्यानंतर पाटील बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन वाॅर्ड क्रमांक १६ मधून पसार झाला होता.

हेही वाचा – पुणे : ‘ससून’मध्ये अनागोंदी कारभार! विभागीय आयुक्त झाडाझडती घेणार

पाटील ससून रुग्णालयातील उपाचर कक्षात मोबाइल संच वापरत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. पाटील जून २०२३ पासून विविध आजार झाल्याचे सांगून ससूनमधील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. तो पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा – चंद्रकांतदादांचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीकडे! आढावा बैठक घेत दिल्या सूचना

पाटील पसार झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाॅर्ड क्रमांक १६ ची अचानक तपासणी करण्याचे आदेश रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. वाॅर्डची तपासणी करुन त्याची नोंद ठेवावी, तसेच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित चौकशी करावी, असे आदेशात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A surprise inspection of the treatment room of prisoners in sassoon hospital will now take place orders of the commissioner of police pune print news rbk 25 ssb

First published on: 06-10-2023 at 11:49 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा