गणेशोत्सवात गर्दीत भाविकांकडील मोबाईल संच लांबविणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून दोन महागडे मोबाईल संच जप्त करण्यात आले.प्रेमकुमार ब्रम्हय्या पी (वय २४, रा. रंगारेड्डी, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक परगावाहून येतात. गर्दीत प्रेमकुमारने नागरिकांकडील मोबाईल संच लांबविले होते. तो पुणे स्टेशन परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी मोहसीन शेख आणि प्रमोद कोकणे यांना मिळाली.

हेही वाचा >>> पिंपरी: कविता कुठेही सुचू शकते, अगदी स्मशानातही – सौमित्र

पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल संच आढळून आले. त्याने पुणे महापालिका परिसरातून मोबाईल संच लांबविल्याची कबुली दिली. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन कांबळे, शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, संजय जाधव, मोहसीन शेख, रेश्मा उकरंडे आदींनी ही कारवाई केली.