भारत जोडो यात्रेसाठी शहरातील एक हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुलढाणा जिल्ह्याकडे गुरुवारी रवाना झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि स्वातंत्र लढ्याशी संबंधित शक्तीस्थळावरून संकलित केलेली माती आणि बोधीवृक्ष यावेळी पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधी यांना देण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. राहुलजी गांधी हे देशातील धर्मभेद, जातीभेद व तिरस्कार मिटविण्यासाठी भारत जोडो यात्रा करीत आहेत. भारतीय जनता पक्षाने गेल्या आठ वर्षांत देश तोडण्याचे राजकारण केले आहे. त्याविरोधात ही यात्रा काढण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, संगीता तिवारी, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, उमेश कंधारे, संदीप मोकाटे, चैतन्य पुरंदरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.