scorecardresearch

हाॅकी खेळताना झालेल्या वादातून महिला आणि तीन मुलींना मारहाण; तीनजण अटकेत

हॉकी खेळताना झालेल्या वादातून चौघांनी एकाच्या घरामध्ये शिरुन त्याची आई आणि तीन बहिणींना गजाने बेदम मारहाण केल्याची घटना वारजे भागात घडली.

A woman and three girls were beaten up after an argument while playing hockey
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : हॉकी खेळताना झालेल्या वादातून चौघांनी एकाच्या घरामध्ये शिरुन त्याची आई आणि तीन बहिणींना गजाने बेदम मारहाण केल्याची घटना वारजे भागात घडली. मारहाणीत दोन अल्पवयीन मुली जखमी झाल्या असून एकीची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली.

  रामनाथ सहानी, राम सहानी, सुधीर सहानी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा सहानी यांनी फिर्याद दिली आहे. वारजेतील दांगट पाटील वस्तीत कृष्णा सहानी आणि आरोपी रामनाथ सहानी यांच्यात हॉकी खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर रामनाथ त्याचा भाऊ राम, सुधीर आणि साथीदारासह कृष्णाच्या घरी गेले. त्या वेळी कृष्णाची आई आणि तीन बहिणी होत्या. आरोपी सहानी यांनी शिवीगाळ सुरु केल्याने त्यांनी घाबरून दरवाजा बंद केला. आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

हेही वाचा >>> राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, चंद्रकांत पाटील यांची टिप्पणी

आरोपींनी कृष्णाची आई आणि तीन बहीणींना गजाने बेदम मारहाण केली तसेच गृहापयोगी वस्तूंची तोडफोड करून दहशत माजविली. मारहाणीत कृष्णाच्या तीन बहिणी जखमी झाल्या आहेत. त्या पैकी एकीची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी झालेल्या चौघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरु केला. तीन आरोपींना पोलिसांनी पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, हनुमंत मासाळ, विजय भुरूक आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 20:10 IST

संबंधित बातम्या