पुणे : लष्करात अधिकारी असल्याची बतावणी करुन एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुनीलकुमार मिना (वय २५, रा. कुंदनकुशलनगर, मानाजीबाग, बोपोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पीडित महिला आणि सुनीलकुमार यांची ओळख झाली होती. त्याने लष्करात अधिकारी असल्याची बतावणी करुन महिलेशी ज‌वळीक केली. तिला बनावट ओळखपत्र दाखवून जाळ्यात ओढले. महिलेच्या मोबाइलमधील छायाचित्रे  स्वत:च्या मोबाइलमध्ये घेतली. त्यानंतर त्या छायाचित्रांचा गैरवापर करुन समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. महिलेने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर त्याने महिलेचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात अडवून विनयभंग केला. महिलेला शिवीगाळ करुन धमकावले. सुनीलकुमार याच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करत आहेत.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
bmc Urges Citizens to Avoid Tree Cutting During Holi warning of Police Complaint for Unauthorised Felling
मुंबई : अनधिकृतपणे वृक्षतोड केल्यास दंड
Patanjali Expresses Regret
बाबा रामदेव यांना धक्का; सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर ‘पतंजली’ची बिनशर्त माफी