scorecardresearch

पुणे : बाह्यवळण मार्गावर वारजे पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

पुणे : बाह्यवळण मार्गावर वारजे पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वारजे पुलावर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. संकल्प चव्हाण (वय २६, मूळ रा. अमरावती) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा- पुणे : मिळकत कर भरण्याची शेवटची संधी; क्षेत्रीय कायार्लये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय

दुचाकीस्वार संकल्प बाह्यवळण मार्गावरून वडगावकडे निघाला होता. वारजे पुलावर दुचाकीस्वार संकल्प याला ट्रकने धडक दिली. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वारजे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रक बाजूला नेला. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपनिरीक्षक तेजस काळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 22:59 IST

संबंधित बातम्या