पुणे : मुंबईतून अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर भागात पकडले. त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे २० ग्रॅम मेफेड्रोन, तीन मोबाइल संच, मोटार असा सात लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असिफअली अलीमुद्दीन शेख (वय २६, रा. कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बाणेर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. शेख हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी साहिल शेख आणि अझीम शेख यांना मिळाली. सापळा लावून असिफअली शेख याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोन, तीन मोबाइल संच, मोटार असा सात लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार

हेही वाचा >>> पुणे : अन्न आणि औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्तांना लाच घेताना पकडले

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, साहिल शेख, आझीम शेख, संदीप जाधव, संदीप जाधव, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर आदींनी ही कारवाई केली.