scorecardresearch

पुणे : वाढदिवसाच्या दिवशी तरुणाला मारहाण करुन लुटले ; संगमवाडी पुलावर घटना

स्वातंत्र्यदिनी अनिकेतचा वाढदिवस होता.

पुणे : वाढदिवसाच्या दिवशी तरुणाला मारहाण करुन लुटले ; संगमवाडी पुलावर घटना
( संग्रहित छायचित्र )

वाढदिवसाची पार्टी करुन घरी जात असलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड मारुन त्याला लुटण्यात आल्याची घटना संगमवाडी पुलाजवळ घडली.
याबाबत अनिकेत भटेवरा (वय २६, रा. कल्याणीनगर, येरवडा) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वातंत्र्यदिनी अनिकेतचा वाढदिवस होता. मित्रांबरोबर वाढदिवसाची पार्टी करुन तो मध्यरात्री दोनच्या सुमारास संगमवाडी पुलावरुन येरवड्याकडे जात होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी अनिकेतला अडवले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अनिकेतच्या डोक्यात चोरट्यांनी दगड मारला. त्याच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले.

पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A young man was beaten and robbed on his birthday pune print news amy

ताज्या बातम्या